संभाजीनगर (औरंगाबाद) : भररस्त्यात दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यातील मारहाणीचा (A rickshaw driver beaten to death by a bike rider) एक व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला आणि त्यानंतर या वादाचे रुपांतर थेट बेदम हाणामारीत झाले. गाडीला धक्का लागला म्हणून दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली आहे. शहरातील वरद गणेश मंदिर परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. मात्र पोलिसात (Police station) कोणतेही तक्रार आली नाहीये. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.
मिळालेल्या अधिक माहिती प्रमाणे, शहराच्या वरद गणेश मंदिर परिसरात एका मोपेड चालक आणि रिक्षाचालक यांच्यात छोटा अपघात झाला. ज्यात मोपेड चालक रस्त्यावर पडला. उपस्थित लोकांनी त्याला उचलले. मात्र उठताच दुचाकीस्वार अक्षरशः रिक्षाचालकावर तुटून पडला. आजूबाजूला असलेल्या लोकांकडून त्याला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. मोपेड चालकाने अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तरुण रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली आहे.
रस्त्यात रिक्षाचालकाकडून मोपेड चालकाला धक्का लागला. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. मात्र लोकांनी त्याला उठवताच तो रिक्षाचालकाच्या अंगावर धावून गेला आणि त्याला धु-धु धुवायला सुरुवात केली. रागात असलेल्या या मोपेड चालकाला आजूबाजूच्या लोकांनी आवरण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या रागापुढे तो प्रयत्न काही टिकला नाही. धक्का लागे बुक्का म्हणतात तसच काही याठिकाणी घडलं. दरम्यान नेहमी वर्दळ असलेल्या या भागात सुरु झालेल्या हाणामारीमुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
या घटनेसंदर्भात अधिक अधिकृत माहिती मिळू शकली नाहीये. तक्रार दाखल नसल्यामुळे गुन्हा देखील दाखल नाहीये. मात्र व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्यक्ती रिक्षाचालकाला त्याच्या शर्टचे बटन तुटले तरी मारतच होता. एवढा राग की त्याने तरुण रिक्षाचालकाला रस्त्यावर लोळवून लोळवून मारहाण केली आहे. विंनती करून देखील संबंधित व्यक्ती मारायचं थांबेना अशात अखेर काही लोकांनी एकत्र येत या संतप्त व्यक्तीला धरून बाजूला करत त्या रिक्षाचालकाची सुटका केली.