त्र्यंबकेश्वर: अंजनेरी (Anjaneri) येथील हनुमान (Hanuman) जन्मस्थळाचा (birthplace) वाद (dispute) चांगलाच पेटला आहे. या वादाविरुद्ध आता नाशिकचे साधू एकवटले आहे. साधू-महंत तसेच ग्रामस्थांनी रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे जन्मभूमी दाव्याचा हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्नाटक (Karnataka) येथील किष्किंधा (Kishkindha) मठाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी नसून किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा (claim) केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. याबाबत त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्याचे खुले आव्हानही दिले आहे. या आव्हानाचा (challenge) स्वीकार करत नाशिकच्या साधू-महंतांसह गावकरी एकत्र झाले. त्यांनी अंजनेरीसह जवळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला. अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावाही पुराव्ह्यासहित सिद्ध करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, आज सकाळी नाशिकचे साधू-महंत लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी एकत्र येत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले आहे. अंजनेरी फाट्यावर नाशिक मधील साधू-महंत एकत्र आले असून त्यांच्या नेतृत्वात (leadership) हे ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरु आहे. या साधू-महंत आणि गावकऱ्यांचा दावा आहे कि, हनुमानाचा जन्म अंजनेरी येथेच झाला आहे.
दरम्यान, जन्मभूमीच्या या वादावर ३१ तारखेला नाशिक (Nashik) मध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधाचे महंत श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू-महंत आव्हान देणार आहेत. यासाठी नाशिकमध्ये सगळे साधू-महंत एकवटले आहे. नाशिकच्या महर्षी पंचायतन पिठात हनुमान जन्मस्थळाबाबत महाचर्चा होणार आहे. त्यामुळे, नाशिकचे साधू संत उद्या होणाऱ्या बैठकीत काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, किष्किंधाचे मठाधिपती गोविंद दास यांनी नाशिक मधील महंत, अभ्यासकांना खुलं आव्हान दिलं आहे. हनुमान यांचे जन्मस्थान किष्किंधा असून त्यांच्या जन्मस्थळाच्या संदर्भात कुठलीही चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंधा ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंद दास यांनी केला आहे.