रोहित शर्माने चिमुरडीची माफी मागून जिंकली चहात्यांची मनं

सध्या इंग्लंड आणि भारतात चालू असलेल्या एक दिवशी सामन्यात भारताच्या चांगल्या गोलंदाजीमुळे पहिला सामना हा जिंकला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यात फलंदाजी करत असताना रोहित शर्माने नाबाद 76 राणांची खेळी खेळली भारतासाठी हा सामना जिंकणे सहज सोपे होते आणि भारताने तो सामना नाबाद राहून जिंकला देखील. हा सामना उपस्थित सर्वांनाच लक्ष्यात राहणार आहे . सामना चालू असताना एक दुर्घटना घटली. त्यामुळे सामना देखील काही काळ थांबवावा लागला होता .


रोहित शर्माने मारलेल्या षटकामुळे स्टेडियम मध्ये प्रेक्षक म्हणून आलेल्या एका चिमुरडीला तो चेंडू लागला या स्टेडियम मध्ये तिला चेंडू लागल्याने जखमी झाल्याची चर्चा पसरू लागली आणि या घटनेने उपस्थित असलेल्या सर्वांचीच मने अस्वस्थ झाली. हा षटकार रोहित शर्मा न मारल्यामुळे रोहित शर्माचं मन देखील अस्वस्थ झालं होतं आणि त्याने सामना संपल्यानंतर त्या मुलीकडे जाऊन तिची भेट घेत तिला चॉकलेट आणि टेडी बेअर देखील दिले आणि तिची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



यावेळी रोहित शर्माची खेळाडू वृत्ती पाहून रोहित शर्माना उपस्थित सर्वच चहात्यांची मनं जिंकून घेतल्याच पाहायला मिळालं. इंग्लंड भारत सामन्या दरम्यान गोलंदाजी करत असलेला इंग्लंडचा डेव्हिड विलीला पुल शॉट खेळताना रोहित शर्माने षटकार मारला आणि त्या चिमुरडीला तो लागला. यावेळी हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फिजिओनी त्या चिमुरडीच्या मदतीसाठी स्टेडियम मध्ये ती बसलेल्या स्टॅन्ड कडे धाव घेतली. या मुळे क्रिकेट प्रेमी इंग्लंडच्या फिजिओ स्टाफचे देखील कौतुक करत आहेत.