नाशिक । प्रतिनिधी
‘द कश्मीर फाइल्स सर्वांनाच भुरळ घातली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा चित्रपट बघण्याचं आवाहन देशवासियांना केलं होते. त्यामुळे रेकॉर्डब्रेक करणारा हा चित्रपट ठरला. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील साधू महंत आता एकत्रित काश्मीर फाईल चित्रपट पाहणार ससून यासाठी जिल्ह्यातील साधू महंतांना याबाबतचे निमंत्रण देण्यात आले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्म (Platform) राज्य करीत पहिल्या सहा दिवसातच करोडोंची कमाई केली आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे…
दरम्यान नाशिकमधूनही या चित्रपटाला उत्तुंग प्रतिसाद लाभला. येथील अनिकेत शास्त्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील साधू महंत याना चित्रपटासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानुसार आज सर्वजण हा चित्रपट पाहणार असल्याची माहिती शास्त्री यांनी दिली आहे.
अनिकेत शास्त्री यांनी आज सीबीएस परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चित्रपटगृहाकडे रवाना झाले. एकीकडे राज्यात भोंगा वरून वातावरण तापले असताना नाशिकमधील साधू महंत काश्मीर फाईल चित्रपट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.