Home » त्र्यंबकेश्वरच्या उपनगराध्यक्षा सायली शिखरे यांचा राजीनामा

त्र्यंबकेश्वरच्या उपनगराध्यक्षा सायली शिखरे यांचा राजीनामा

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

त्रंबकेश्वरच्या उपनगराध्यक्षा सायली शिखरे यांनी राजीनामा दिल्याने पुढील उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगरपालिकेतील नगरसेवक अंतर्गत ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार शिखरे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान उपनगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तर शिल्पा रामायणे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱ्या बैठकीत नवीन उपनगराध्यक्ष यांची निवड होईल.

दरम्यान या आठवड्यातच विविध विषय समित्यांचे सभापती निवडले जाणार आहे,त्यामुळे फेब्रुवारीअखेर पालिकेत विविध घडामोडींना वेग आला आहे. तसेच त्र्यंबक नगरपरिषदेचा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन कर्मचारी व मुख्याधिकारी बिझी असल्याचे चित्र पाहायला मिळते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!