Home » संजय राऊत पुन्हा संतापले, म्हणाले ‘भाजपचे टगे..’ !

संजय राऊत पुन्हा संतापले, म्हणाले ‘भाजपचे टगे..’ !

by नाशिक तक
0 comment

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यासोबतच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक उद्गाराचे अजूनही पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये लव जिहादच्या विरोधासह छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानंविरोधात विराट हिंदू मूक मोर्चा काढण्यात आला आहे तर आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपचे टगे महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहे.’ अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच संताप व्यक्त करत भाजपला थेट वेट अँड वॉचचा इशाराही दिला आहे.

‘पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली. पण भाजपचे टगे राज्यपालांची बाजू घेऊन आम्हालाच शहाणपण शिकवत आहेत, हे महाराष्ट्र बघत आहे. महाराष्ट्र संतापलेला आहे. महाराष्ट्र आतून खवळलेला आहे. याचा आतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. वेट अँड वॉच, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान होतोय. आमच्या अराध्य दैवताच अपमान भाजपच्या आराध्य दैवातांकडून म्हणजेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून होतोय, त्यांचे राष्ट्रीय प्रवक्तेही अपमान करत आहेत. पण भाजपचे टगे राज्यपालांची बाजू घेऊन आम्हालाच शहाणपण शिकवत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

जे नेते जिवंत नाही, त्यांच्यावर चिखलफेक करून राजकारण कसलं करताय?

पंडित नेहरूंवर चिखलफेक थांबवा हे आम्हीच सर्वात आधी म्हणालो होतो. पंडित नेहरू होते म्हणून हा देश पुढे गेला. या देशातील कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये. नेहरू, आंबेडकर, पटेल आणि सावरकर यांचा अपमान होऊ नये. जे नेते जिवंत नाही, त्यांच्यावर चिखलफेक करून राजकारण कसलं करताय? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे दाट पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या या भूमिकेवरही संजय राऊतांनी भाप्व्र निष्ण साधला आहे. ‘वीर सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर द्या ना त्यांना भारतरत्न, इंडिया गेटवर सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारला. तिथे सावरकरांचा पुतळा का उभारला नाही? लावा ना सावरकरांचा पुतळा. आम्ही येतो स्वागत करायला. पण नाही. यांना फक्त सावरकरांच्या नावाने राजकारण करायचं आहे. आमचं तसं नाही, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!