संजय राऊत दुहेरी संकटात; धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. एक हजार चौतीस कोटींच्या पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या घरी जाऊन नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. त्यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये देखील ईडीन जप्त केले त्यानंतर अखेर संजय राऊत यांना मध्यरात्री इडी कडून अटक करण्यात आली. यासोबतच संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली ती म्हणजे स्वप्ना पाटकर यांना धमकवल्याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्ना पाटकर यांनी धमकवल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर शनिवारी संजय राऊत यांच्यावर यांची दाखल करण्यात आली होती मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर संजय राऊत यांच्यावर 504 आणि 509 प्रमाणे एफ आय आर दाखल करण्यात आली आहे.

पाटकर पात्र जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार !

यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका महिलेला मालमत्तेबाबत धमकावल जात असल्याचे दिसत आहे . राऊत यांनी काही मालमत्ता आपल्या नावावर करून देण्याची धमकी देत ​​जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही धमकी त्याने स्वप्ना पाटकर यांना दिल्याचे बोलले जात आहे. पाटकर हे पात्रा जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटकर यांनी ईडीसमोर जबाब दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार वाकोला पोलिस ठाण्यात देण्यात आली .