नाशिक : संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा ठरला असून उद्यापासून ते नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. शहरात सध्या ठाकरे गोटात भीतीचे वातावरण असून 12 नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. तसेच जिल्ह्यात शिवसेनेतील आमदार खासदारांमुळे झालेले डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक होण्यापूर्वी काही दिवस अगोदर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना अटक झाली. १०३ दिवस त्यानंतर संजय राऊत कोठडीत होते. त्यानंतर आता त्यांचा पहिलाच नाशिक दौरा असून जिल्ह्यातील ठाकरे गट कार्यकर्त्यांना यामुळे स्फुरण चढणार आहे.
1 डिसेंबरला संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून 2 डिसेंबरला पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि सायंकाळी मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरू केली असून निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार हजेरी लावणार असल्याचे चित्र सध्या आहे.
ठाकरे गट शिवसेनेतील एक मोठा गट नाराज असल्याचे चर्चा आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील 12 नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
संपर्क प्रमुख म्हणतात,
ठाकरे गट संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी म्हणाले की, “बऱ्याच दिवसानंतर राऊत साहेब हे नाशिक दौऱ्यावर येत असून पदाधिकारी व नगरसेवकांशी वन टू वन चर्चा करण्याबरोबरच शुक्रवारी सायंकाळी एक मेळावा घेण्याचे ही नियोजन आहे मात्र अद्याप दौरा अंतिम झालेला नाही.