घरात शिरायचं नाही…नाहीतर महागात पडेल !

नाशिक । प्रतिनिधी

राजकारणात घरातल्याना आणायचं काम नाही, पहाटे चार वाजता, तीन वाजता ईडीच्या धाडी पडत आहेत, इतर लोक पत्रकार परिषद घेऊन, तपास यंत्रणांचा सोबत घेऊन आम्हाला खोट पाडताय , पण असं होणार नाही, हे सरकार पडणार नाही, माझ्या आजूबाजूच्या लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न केला जात आहे, पण घरात शिरायचं नाही, नाहीतर शिवसेना फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) बोलत आहेत. त्यावेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून सज्जड दम भरला आहे. शिवसेना सत्तेत आहे. त्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखा शिवसेनेचा एक सोज्वळ चेहरा हा मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे शिवसेना शांत आहे. सत्तेत आहे आणि शांत आहे याचा अर्थ आम्ही ‘गां*’ ची आवलाद नाही. खोटारड्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा रोष त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राजकारण झालं नव्हतं, पण गेल्या वर्षभरापासून घाणेरडे राजकारण विरोधी पक्षाकडून सुरु आहे. मुख्यमंत्री म्हणाले, कि आधी लोकांसमोर सत्य येऊ द्या, मग आपण सामोरे जाऊ. तत्पूर्वी हि पत्रकार परिषद एडी कार्यालयासमोर घेणार होतो.. पण आम्ही नमते घेतले.

म्हणजे आमचे कुटुंबीय त्रास सहन करणार, अन भाजपचे लोक टाळ्या वाजविणारे, हि कसली मानसिकता? असा संताप व्यक्त केला. याचबरोबर, विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांची पोलखोल त्यांनी यावेळी केली.