संतोष बांगर हल्ला प्रकरण; बांगर आक्रमक होत म्हणाले, तुकडे तुकडे करणार…

शिंदे गट आमदार संतोष बांगर यांच्या गादीवर जमावाने हल्ला केला आहे. यावेळी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत. काही लोकांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला चढवला, हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून शिवसैनिकच आहेत असे आमदार बांगर यांनी सांगितले, तसेच हा हल्ला नाही तर भ्याड हल्ला असल्याचे बांगर म्हणाले, आपल्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे-तुकडे करणार असा खुला इशाराही आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.


काय आहे प्रकरण??

आमदार संतोष बांगर हे रविवारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत काही लोकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काही लोकांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला देखील चढवला, या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.


आमदार बांगर आक्रमक

आमदार संतोष बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरून येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे’, असं बांगर म्हणाले. ‘माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते’, असे खुले आव्हानही संतोष बांगर यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सोबत फोन वरून संवाद साधला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले आहे.

नवा वाद उफाळला

सत्तांतरानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सतत वाद होत आहेत. त्यात शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर हल्ले होत असून आता पर्यंत उदय सामंत, तानाजी सावंत आणि आता आमदार संतोष बांगर यांच्यावर जमावाने हल्ला चढवला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांचा वाद उफाळत असून तो काही केल्या कमी होत नाहीये.