मोठी बातमी..! ‘या’ कारणामुळे वणीचे सप्तशृंगी मंदिर ४५ दिवस राहणार बंद

By Pranita Borse

नाशिक: वणी(Vani) येथील सप्तशृंगी मंदिर ४५ दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे. ४५ दिवस सप्तशृंगी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २२ जुलैपासून ०५ सप्टेंबरपर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वणी येथील गडावरील (Vani Saptshrungi Gad) सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे २२ जुलै ते ५ सप्टेंबर म्हणजेच ४५ दिवस भाविकांना वणी गडावर दर्शन घेण्यासाठी जाता येणार नाही. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सुचना देखील शासनाच्या पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, २२ जुलै ते ०५ सप्टेंबर याकाळात केवळ मंदिर बंद असणार आहे. येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे. यासोबतच तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असेल असेही मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आलं आहे.

याआधीही कोरोनामुळे सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला होता. मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अशात भाविकांचा हा उत्साह कायम असावा म्हणून याकाळात केवळ मंदिर बंद असणार आहे. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मुकाव लागणार नाही या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या वतीने श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे.