कोलकत्ता | भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती . या पोस्ट मुळे क्रिकेट विश्वात अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची देखील अफवा वाऱ्यासारखी पसरू लागली होती. आणि या पोस्ट नंतर बोर्डाचे सचिव जय शहा यांना स्पष्टीकरण द्यावे लागले .
गांगुली यांनी एक नवी सुरुवात करणार असल्याचे म्हटले होते .यामुळे लोकांनी या पोस्टाचा वेगळाच अर्थ काढत गांगुलीने राजीनामा दिल्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि एकच चर्चा रंगू लागली त्या पोस्ट नंतर सौरभ गांगुली यांनी एक पोस्ट टाकली आहे. आणि या पोस्ट मधून त्यांनी आता बीसीसीआय अध्यक्ष पदावरील राजीनाम्याच्या चर्चांवर विराम दिला आहे. ‘क्लासप्लस’ हे नवे शैक्षणिक अँप लॉंच केले आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत गंगाली यांनी या अँप चा फायदा शिक्षकांसोबतच विध्यार्थ्यांना होणार असल्याचं म्हटलं आहे. तर केललं ते ट्विट या अँप बद्दल केले असल्याचे सांगत लोकांनी याचा वेगवेगळा अर्थ काढला.
‘त्या ‘ पोस्ट मध्ये काय म्हटलंय !
गांगुली यांनी केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” मी १९९२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली, या गोष्टीला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या प्रत्येक व्यक्तीचे मी धन्यवाद मानू इच्छितो. क्रिकेटने आतापर्यंत मला बरेच काही दिले आहे. पण आता मला काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून या गोष्टीचा फायदा बऱ्याच लोकांना होऊ शकतो. आयुष्यात या पुढेही तुम्ही मला कायम पाठिंबा द्याल, अशी आशा मी करतो.”
या पोस्ट मधून सौरभ गांगुली यांनी त्यांच्या क्रिकेटच्या सुरवातीपासून तर २०२२ पर्यंतचा उल्लेख केला आहे. १९९२ ला क्रिकेटला सुरवात केल्याचे म्हणत त्या गोष्टीला आता ३० वर्ष झाल्याचे पोस्ट मधून सांगितले आहे. या कालावधीत सौरभ गांगुली याना पाठिंबा देणाऱ्या प्रत्यकाचे त्यांनी आभार मानले आहेत नवीन गोष्टी साठी तसाच पाठिंबा द्याल असे देखील आव्हान केले आहे.