नाशिकमध्ये सुरु होणाऱ्या महाआरतीची ‘अशी’ असणार झलक

नाशिक : अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारमध्ये होणाऱ्या गंगा महाआरतीच्या (Ganga Maha-aarti) धर्तीवर नाशिकमध्ये देखील गोदावरी नदीची महाआरती (Godavari River Aarti) करण्याचा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर आता या आरतीचा प्राथमिक दृष्ट्या एक प्रारूप आरखाडा देखील तयार झाला आहे (A preliminary draft of Goda Aarti is prepared). या प्रस्तावाला तत्वता मान्यता देखील दिल्याची माहिती या महारतीसाठी पाठवपुरावा करणारे नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी दिली आहे. गोदातीरी असलेल्या रामकुंड परिसरात रोज महाआरती केली जाणार आहे. गोदातीरी सुरवात होणाऱ्या या महाआरतीचे प्राथमिक प्रारूप आराखडा कशाप्रकारे त्याचे हे काही दृश्य

अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदीचीही रोज महाआरती होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. या महाआरतीसाठी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या संदर्भात तयार झालेल्या आराखड्याची पहिली झलक समोर आली आहे. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. या आधी अनिकेत शास्त्री यांनी केंद्र सरकारकडे गोदावरी नदीवर महाआरतीची मागणी केली होती. केंद्र सरकारने याबाबतचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर अनिकेत शास्त्री यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक निर्णय घेत गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर केला आणि यासाठी आराखडा तयार करून आरतीला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते.

या महा आरतीच्या आराखड्याचे सादरीकरण काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. या आराखड्यात अजून काही त्रुटी आहेत. मात्र त्या दूर करून लवकरच या महाआरतीचा फायनल आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे. दरम्यान प्राथमिक दृष्ट्या प्रारूप आराखड्याची पहिली झलक समोर आली आहे. तर हा आराखडा पाहून मन भक्तिभावनेने तृप्त होत आहे.

नाशिकच्या रामकुंडावर होणारी ही महाआरती अत्यंत महत्वाची असणार आहे. रामकुंडावर भाविक भक्तांसह पर्यटकांचीही लगबग असते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही आरतीचा हा सोहळा महत्वाचा असणार आहे. अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या या महा आरतीमुळे गोदामाईचे महत्व आणखी वाढेल. दरम्यान या महाआरतीचा प्राथमिक प्रारूप आराखड पाहून नाशिककरांचा आनंद आणखी वाढला आहे.