आशीर्वाद सेवाधाम ट्रस्टमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे…

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : समाजातील सद्यस्थिती बघता मुलींचा वावर हा अधिक कठीण होत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीला स्वतःचे आत्मरक्षण हे आलेच पाहिजे, या विचाराला अनुसरून बालगृहातील मुलींसाठी आशीर्वाद सेवाधाम संस्थेत स्वसंरक्षणाचे (एल्लो बेल्ट कराटे) क्लासेसचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून भविष्यात त्यांच्यावरती एखादी विकृत घटना ओढावली, तर त्या स्वतःचे रक्षण स्वतः करू शकता. ग्लेडिएटर अकादमीचे संस्थापक राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली नभा नडसे मॅडम यांनी मुलींना व्यवस्थितरित्या स्वसंरक्षणाचे धडे शिकवले. दि. २५ मे रोजी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील आणि डॉ. जुही सचिन पाटील यांच्या हस्ते मुलींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाने मुलींचा हुरूप वाढला. यावेळी सचिन पाटील म्हणाले की, सेल्फ डिफेन्स हे प्रत्येक मुलीला यायलाच हवे. जेणेकरुन भविष्यात वाईट संकटांना मुली सामोरे जाऊ शकतात. तसेच त्यांनी मुलींना ही कला (ट्रेंनिग) अधिक वरच्या स्तरावर आत्मसात करण्यास प्रेरित केले. डॉ. जुही पाटील यांनी देखील मुलींचे मनोधैर्य त्यांच्या शब्दांनी वाढवले. त्यांनी संस्थेमध्ये मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या टेलरिंग मशीन कोर्स, ब्युटीपार्लर, बुद्धिबळ, पॉटरी मेकिंग, डिजिटल मार्केटिंग, ड्राइविंग, सॉफ्टस्किल, राइटिंग स्किल या कोर्सेससाठी मुलींना प्रेरित करुण शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेच्या वतीने पोलिस अधीक्षक सचिन पाटील व डॉ. जुही पाटील यांचे मुलींनी हाताने बनविलेल्या वस्तू देऊन अभिवादन व धन्यवाद करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व संस्थाचालक महंत डॉ. रत्नाकर पवार, डॉ. सौ. सुलभा पवार, आशीर्वाद पवार, सौ. तेजस्विनी पवार व संस्थेच्या अधीक्षका सौ. ऐश्वर्या परदेशी व प्रेरणा निकम उपस्थित होत्या.

आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट गेल्या तीस वर्षांहून अधिक वर्ष अनाथ, वंचित, निराधार, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथे कार्यरत आहे. संस्थेच्या मार्फत श्रीमती गार्डा बालसदन (बालगृह ) विषेशतः मुलींसाठी विनाअनुदानित तत्वावर कार्यरत आहे. या बालसदनात प्रवेश घेतलेल्या बालकांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तसेच बालिकांचे संगोपन, सक्षमीकरण, कौशल्य विकास यांच्यावर भर देण्याचे काम करत आहे.

आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट ही संस्था खंबाळे ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे ५ एकर परिसरात १३००० स्के. फिट बांधकाम बालसदन (बालगृह ) चालवत आहे. बालसदनात मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र कंप्यूटर लॅब (कार्यशाळा), स्टडी रूम (अभ्यास कक्ष), वाचनालय, बेडरूम, किचन कार्यशाळा, शिलाई कार्यशाळा असे विविध प्रकारचे आधुनिक व सांस्कृतिक माध्यमातून मुलींच्या आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकत आहे. संस्थेमार्फत आजवर अनेक बालकांनी शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्रात स्वतःच्या स्वबळावर उभे राहण्याची कामगिरी केली आहे. बालसदनास महिला व बालविकास, बालकल्याण समिती यांची मान्यता प्राप्त असून, ही संस्था बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत आहे .