शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याला नाशिकपासून सुरुवात

नाशिक : आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सरु होत आहे. याची सुरुवात नाशिकपासून होत असून आज आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, बीड, संभाजीनगरमध्ये होणार आहे. दरम्यान आज युवा नेते आदित्य ठाकरे इगतपुरी आणि सिन्नर मध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम तर संध्याकाळी नाशिकच्या देवळाली मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली असताना आजच्या सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागून असणार आहे.

ठाकरे गटाला नाशिकमध्ये गळती लागल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांची पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे. आज आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर (Aditya Thackeray’s visit to Nashik) असून ते देवळाली गावात जाहीर सभा घेणार आहेत. नाशिकमधील शिवसेनेच्या गळतीनंतर त्यांची ही पहिली सभा असून ते या सभेत काय बोलणार..? त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मधील शिवसेनेला पुन्हा बहर येईल का..? आणि त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सायंकाळी सहा वाजता नाशिक रोडच्या आनंद ऋषीजी शाळेमागील सुवर्ण सोसायटीच्या पटांगणात ही सभा होणार आहे. या सभेची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. आदित्य ठाकरे हे देवळाली गावात सभा घेणार असून माजी नगरसेविका कै. सत्यभामा गाडेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या आधी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावत शिंदे गट आणि विशेषतः नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला होता. दरम्यान आज आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार.? याकडे नजरा खिळल्या आहे.

आज शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा

आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आज सुरु होत असून याचे नियोजन पुढील प्रमाणे असणार आहे. पहिल्या दिवसात म्हणजेच आज (६ फेब्रुवारी २०१३) इगतपुरी मुंढेगाव येथे संवाद वेळ दुपारी १२:४५, सिन्नर येथे वडगाव पिंगळा संवाद, दुपारी २:३०, सिन्नरब येथे संवाद सायंकाळी ३:४५, पळसे येथे संवाद सायंकाळी ४:४५, नाशिक मेळावा सायंकाळी ५:४५.

मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी चांदोरी, निफाड या ठिकाणी संवाद, वेळ सकाळी ११:१५, नाशिक मध्ये दुपारी १ वाजता संवाद, नांदगाव मध्ये दुपारी ३ वाजता संवाद तर संभाजीनगर मध्ये सायंकाळी ५:३५ वाजता संवाद साधणार आहेत.