नाशिक : नाशिकमधील एका ३२ वर्षीय महिलेने एका १६ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्या घटनेत आता काही धक्कादायक खुलासे झाले आहे. नाशिकच्या या महिलेने ठाण्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला कसे फसवले आणि त्याला व्यसन लावले याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मुलाला सध्या बालसुधार गृहात पाठविण्यात आले असून त्याच्या आईने महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घडलेली घटना अशी की पिडीत ठाण्यातील मुलाचे नाशिकमध्ये जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे तो नाशिकमध्ये त्याच्या ये जा करत असायचा. या दरम्यान त्याची नाशिकमध्ये नातेवाईकांच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेशी ओळख झाली होती.
मिळालेल्या अधिक प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी महिलेने त्या अल्पवयीन मुलाशी ओळख वाढवली. हळू हळू जवळीक वाढवत एकदा त्याला बंद खोलीत बोलावून जबरदस्तीने मद्य पाजले. त्याला मोबाईलमधून अश्लील व्हिडीओ दाखवले. मुलाचे मानसिक संतुलन बिघडवण्याचे काम केले. मुलासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे तिने स्वत:ला विवस्त्र आणि मुलाला विवस्त्र करून मोबाईलवर व्हिडिओ बनवला. त्याला मद्याचे व्यसन लावले.
मुलगा कोणाशीतरी फोनवर बोलायचा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचा. त्याच्या स्वभावातील बद्दल यामुळे आईला संशय आला. त्यातून आईने त्याचा मोबाईल तपासला एका व्हिडिओ तिला दिसला. ते पाहून तिला मोठा धक्का बसला त्यात तिचा मुलगा एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचे तिला आढळले.
मुलाने महिलेशी वारंवार संपर्कात येऊन शरीर संबंध ठेवल्याचे नंतर समोर आले. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता. २०१९ मध्ये मुलगा आणि महिलेची ओळख झाली होती. तेव्हापासून मुलाचे शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागले. तो शाळेला दांडी मारायचा. नाशिकला ये-जा करायचा आणि त्याला विरोध केल्या तर चिडचिड करायचा. दरम्यान आरोपी महिलेने या मुलाला आपल्या संपर्कात ठेवण्यासाठी आणि अश्लील व्हिडीओ पाहण्यासाठी मोबाइल घेऊन दिल्याचाही आरोप त्याच्या आईकडून करण्यात आला होता.
ही संपूर्ण घटनाच खरतर खूप धक्कादायक आहे. या संपूर्ण घटनेनंतर मुलाच्या पालकांना देखील धक्का बसला आहे. संशयित आरोपी महिला ही स्वतः २ मुलांची आई असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान त्या आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून याबाबत मुलाने संपूर्ण घटना सांगितली आहे. कुटुंबीयांनी सध्या मुलाला बालसुधारगृहात दाखल केले आहे. तेथे मुलाचे समुपदेशन करण्यात येत आहे.