‘भरपूर झालं झाडी, डोंगार..’ शहाजी बापूंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..’ या डायलॉगमुळे महाराष्ट्रभर चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Sangola MLA Shahaji Bapu Patil) पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. ‘श्री. विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील (Mr. Abhijit Patil, Chairman of Shree Vitthal Sugar Factory) यांना सांगोल्यातून आमदार करा माझ झाडी डोंगार भरपूर झालं,’ असं साकडं शहजीबापुंनी जाहीरपणे घातलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. श्री. विठ्ठल साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते.

‘श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना सांगोल्यातून आमदार करा. माझ झाडी डोंगर भरपूर झालं आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर घ्या असं (Take me to the Legislative Council) आमदार शहाजी बापू पाटील यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकरही उपस्थित होते. नांदेडमध्ये गेलो की गर्दी, कोकणात गेलो तरी गर्दी, त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषेदवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी शहाजीबापू पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्यासमोर केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा शहाजी बापू लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले. त्यांची बोलण्याची शैली आणि रांगड्या भाषेमुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. बंडखोरीनंतर गुवाहाटीतील शहाजी बापूंचा ‘काय झाडी, काय डोंगार डायलॉग समाज माध्यमांवर रील्स मधेही दिसला आणि त्यावर गाणही बवण्यात आलं. दरम्यान आता श्री. विठ्ठल साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ‘माझ झाडी डोंगार भरपूर झालं. श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना सांगोल्यातून आमदार करा. मला विधान परिषदेवर घ्या’ अशी मागणीच शहाजी बापूंनी केली आहे.

आगामी विधानसभा लढवणार नाही, अभिजित पाटलांना उमेदवारी द्या अशी घोषणा शहाजी बापूंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे २०१९ विधानसभा निवडणुकीत (2019 Assembly Elections) शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा अवघ्या काही मताने पराभव करत शहाजीबापू सांगोल्यातून विजयी झाले. पण पुढच्या निवडणुकीत त्यांना शेकापचं मोठं आव्हान असणार आहे, त्यामुळेच विधानसभेऐवजी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावत असल्याची एक चर्चा आहे.