भाजपचे ‘अच्छे दिन’ वरून शरद पवार केंद्र सरकार बरसले

भाजपचे अच्छे दिन नागरिकांना कधीच पाहायला मिळाले नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे आज ठाणे दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात केंद्र सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.


शरद पवार म्हणाले की, आजवर शब्द आणि आश्वासने मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत. या आश्वासनांचा आढवा घेतला तर प्रत्यक्षात तिथे काहीच नाहीये. २०२१ साली निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिनचे चित्र नागरिकांना कधी जाणवले नाही. अच्छे दिन नागरीकांना कधीच पाहायला मिळाले नाही. २०२२ ला पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले असून न्यू इंडीया २०२२ अशी घोषणा करण्यात आली. २०२४ साठी आता नवीन आश्वासन दिले जात आहे, ते म्हणजे ट्रीलियन इकॉनॉमी आम्ही करू असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांगितल्यापैकी एकाही गोष्टीच शंभर टक्के पूर्तता झाल्याचे दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

ठाणे तसेच राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. ठाणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी काही जिल्ह्यांचा दौरा करणार करणार आहे. दौऱ्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यापासून करणार आहे. अच्छे दिन लोकांना पहायला मिळालेच नाही. २०१८ मध्ये ग्रामपंचायतींना दिलेली आश्वासने अपूर्णच आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन आश्वासन अपूर्णच आहे. ३० टक्के घरात शौचालये नाहीत, तसेच केंद्राने दिलेल्या अनेक आश्वासने पूर्णच न झाल्याचे पवारांनी सांगितले आहे.