हनुमान जन्मस्थळ वाद.. ३१ तारखेला शास्त्रार्थ सभेचे आयोजन

नाशिक : हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरून (birth place) सुरु असलेला वाद (dispute) चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकातील किष्किंधा (Kishkindha) हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती महंत गोविंद दास यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. इतकेच नाही तर महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) मध्ये दाखल झाले आहे. त्यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि वादविवाद करण्यासाठी महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वर येथे आलेले आहेत.

या संदर्भात एक महत्वाची माहिती मिळत असून, जन्मभूमीच्या या वादावर ३१ तारखेला नाशिक (Nashik) मध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधाचे महंत श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार आहेत. यासाठी नाशिकमध्ये सगळे साधू-महंत एकवटले आहे. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठात हनुमान जन्मस्थळाबाबत महाचर्चा होणार आहे.

दरम्यान, किष्किंधा चे मठाधिपती गोविंद दास यांनी नाशिक मधील महंत, अभ्यासकांना खुलं आव्हान दिलं आहे. हनुमान यांचे जन्मस्थान किष्किंधा असून त्यांच्या जन्मस्थळाच्या संदर्भात कुठलीही चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंधा ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंद दास यांनी केला आहे.