Home » ‘शेल्टर २०२२’ गृहप्रदर्शन ठरतंय गृह स्वप्नपूर्तीचा उत्सव

‘शेल्टर २०२२’ गृहप्रदर्शन ठरतंय गृह स्वप्नपूर्तीचा उत्सव

by नाशिक तक
0 comment

नाशिक : शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या शेल्टर हे गृहप्रदर्शन खऱ्या अर्थाने गृह स्वप्नपूर्तीचा उत्सव ठरत आहे. विविध आकर्षक सवलती व ऑफर्स गृह कर्जाचे आकर्षक दर यामुळे ग्राहकांना स्पॉट बुकिंग करणं अगदी सोपं झालं आहे. रविवार असल्याने काल नाशिककरांनी या प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच विविध स्टॉलला भेट देऊन गृह खरेदीसाठी बुकिंग देखील केल्या आहे.

या प्रदर्शनामध्ये ज्या व्यवसायिकांनी आपले स्टॉल बुक केले होते. त्यांना देखील चांगला प्रतिसाद लाभला असून त्यांच्याकडे देखील चांगल्या प्रकारे बुकिंग झाल्याचची महिती स्टॉलधारकांनी दिली आहे. काल सुट्टीचा दिवस असल्याने नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात प्रदर्शनास गर्दी केली होती. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जवळपास ३०० हून अधिक सदनिका बुक झाल्याचे तसेच, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील नागरिकांनी देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपले घर बुक केले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली. त्यासोबतच आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचा अहवान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेल्टर आणि क्रेडाईचा गौरवशाली इतिहास

स्वतःचे हक्काचे स्वप्नातील घर हा प्रत्येकाच्या आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आणि रोटी कपडा व मकान या मूलभूत गरजांपैकी एक आहे. प्रत्येकाला स्वप्नातील हक्काचे घर मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारा समाजातील एक घटक म्हणजे बांधकाम व्यावसायिक. बांधकाम व्यावसायिक स्वतःचे अनुभव व कौशल्य वापरून बांधकामासाठी लागणाऱ्या विविध घटकांचा एकत्रित करून घराची निर्मिती करतो. घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाची भूमिका मोलाची असते. तसेच शहराच्या विकासामध्ये व अर्थचक्र फिरवण्यामध्ये देखील बांधकाम व्यवसायिकाची भूमिका महत्वपूर्ण ठरते. अशीच एक संकल्पना घेऊन शेल्टर क्रेडाई मेट्रो नाशकात भव्य दालन भरवण्यात आले आहे.

बांधकाम उद्योग हा शहराच्या अर्थकारणाशी निगडित असून या उद्योगांमधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. नाशिकमध्ये येऊ घातलेल्या अनेक नव्या व्यवसाय आणि उद्योगाच्या संधीमुळे नाशिकचे भविष्यातील चित्र खूप आवश्यक असून आज रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिक मधील गुंतवणूक निश्चितच ठरणार आहे. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेत येथील रिअल इस्टेटचे दर तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याने नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चित फायदेशीर ठरणार असे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन तसेच शेल्टर समन्वयक कुणाल पाटील हे बोलले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!