जळगाव : जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळासह गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे हे अध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात गैरकारभार झाल्याच्या आरोपावरून त्याच्या चौकशीसाठी शासनाने पाच सदस्य चौकशी समिती गठित केली असून सहकार विभागाच्या पाच अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.
तर यासह शिंदे सरकारने खडसेंना दुसरा धक्का दिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार खडसे यांचे नेतृत्व असलेल्या दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करून मुख्य प्रशासक म्हणून आमदार गिरीश महाजन यांचे समर्थक समजले जाणारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची वर्णी लागली आहे या प्रशासक मंडळात 15 जणांचा समावेश आहे एकाच दिवशी दूध संघाबाबत दोन पत्र निघाल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी आदेश काढला आहे या आदेशाची प्रत दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त यांना पाठविण्यात आली आहे .या आदेश जळगाव जिल्ह्यात सहकारी दूध उत्पादक संघाच्या गैर कारभार चौकशी करण्याबाबत आमदार गिरीश महाजन यांच्या आठ जुलै 2022 रोजी पत्रानवे नागराज जनार्दन पाटील यांची जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केलेल्या अनियमित्येच्या संदर्भात तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्याची विनंती केली होती त्यात अनुसरून मुख्यमंत्री यांनी तपासून तत्काळ कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.