शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटविरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष आता शिवसेनेत पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे अनेक मोठ्या महापालिकेतील नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. असे असताना शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील नेते आता मैदानात उतरले आहेत युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील मोठ्या प्रमाणात शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आदित्य ठाकरे हे निष्ठायात्रा, शिव संवाद यामार्फत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत असे असले तरी आता आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गट ही तयारी करत आहे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला आव्हान देण्यासाठी आता शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाई यांचे चिरंजीव पूर्वेस सरनाईक हे आव्हान देणार आहेत . शिंदे गटात सहभागी झालेले पूर्वेश सरनाईक युवा सेनेतील तरुण शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत पूर्वेस सरनाईक आणि किरण साळी यांची युवा सेनेतून हकलपट्टी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता हे शिंदे गटातील तरुण नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आव्हान देण्यासाठी शक्ती प्रदर्शन करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.