शिंदे टोलनाका बंद होणार ?

नाशिक : पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे येथील टोलनाका हा बेकायदेशीर असून नियमानुसार स्थानिकांना टोलमाप असताना देखील त्यांच्याकडून टोल वसूल केला जात असल्याने आता हा टोल नाका बंद करण्याची मागणी भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गावाजवळील टोल प्लाजा नाशिक महानगरपालिका हद्दीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असून राज्यमार्ग विभागाच्या पत्रानुसार टोल महानगरपालिका हद्दीपासून दहा किलोमीटर अंतराच्या पुढे असणे आवश्यक असते माळेगाव ,मुसळगाव औद्योगिक वसाहत तसेच सिन्नर शहरातील स्थानिक वाहनधारकांना टोलमध्ये सूट असताना गेली तीन वर्ष नऊ महिने टोल भरण्याचा नाहक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.


.त्यामुळे हा टोल प्लाझा सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने बायबॅक करून बंद करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकरता लागणारा कच्चामाल सातपूर अंबड नाशिक व नाशिक रोड येथून येतो तसेच तयार होणारा पक्कामाल नाशिक अंबड सातपूर येथे जातो त्यामुळे या स्थानिक वाहनधारक उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक दररोज सिन्नर ते नाशिक व नाशिक ते सिन्नर अशी सतत सुरू असते मात्र टोल भरावा लागत असल्याने याचा परिणाम उत्पादन किमतीवर होत आहे. त्यामुळे हा टोल तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे,निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार आणि पियुष गोयल यांना पाठविण्यात आल्या आहेत. या अघोधार देखील टोल बंद करण्याची मागणी करण्यात आली होती . आणि आता देखील टोल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आधी हा टोलनाका अनेकवेळा टोल वसुलीवरून चर्चेत आला आहे . त्यामुळे आता हा टोल नाक्याचा विषय किती गांभिर्याने घेतला जातो ते पाहणं म्हत्वाच ठरणार आहे .