मोठी बातमी.!उद्धव ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का खासदार फुटले ?

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता अनेक मोठमोठ्या महानगरपालिकेतील नगरसेवक ,जिल्हाप्रमुख ,अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आता शिंदे गटात सामील होत आहेत. असे असताना आता आमदारान पाठोपाठ खासदारही शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा चालू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.


शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याची बातमी समोर आली आहे शिवसेनेच्या एकूण 18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अरविंद सावंत, विनायक राऊत ,ओमराजे निंबाळकर ,गजानन कीर्तिकर हे चार खासदार वगळता बाकी खासदार शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकीकडे शिवसेनेतून हकालपट्टी आणि राजीनाम्याचे सत्र सुरू असताना आता दुसरीकडे शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

शिंदे गटाच्या बैठकीत १४ खासदार उपस्थित असल्याच्या बातमीने आता शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून बैठकीनंतरच हे खासदार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चे संदर्भातील चित्र आज स्पष्ट होऊ शकते . राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्या नंतर सेना खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या .