Video : नाशिकमध्ये शिवसेनेने काढली किरिट सोमय्यांची अंत्ययात्रा

नाशिक । प्रतिनिधी
किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे शेकडो नेते आंदोलनात सहभागी झाले असून नाशिकमध्ये किरीट सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत आणि आमदार किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच राजकीय वाद रंगला आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी किरीट सोमय्यांना अटक करावी यासाठी शिवसेनेचे विभागवार आंदोलनं सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमया यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी देखील करण्यात आला.

यावेळी शिवसेना पदाधिकारी ,महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. किरीट सोमय्या यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तर किरीट सोमया यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी सेनेकडून करण्यात आली.

आयएनएस विक्रांत साठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर सोमय्या त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे..या पार्श्वभूमीवर राज्यभर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.