शिवसेना खासदार देखील भाजपा सोबत जाण्यासाठी आग्रही..!

By Pavan Yeole
नाशिक : शिवसेना आमदारांनंतर सेना खासदार देखील भाजप बरोबर जाण्याची मागणी करू लागले आहेत. काल मुंबई येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी भाजप पुरस्कृत उमेदवार द्रोपदी मूर्मु यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपला मदत करावी अशी शिवसेना खासदारांनी मागणी केली असल्याचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितल आहे. काल उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.


द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदासाठीच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असे देखील उद्धव ठाकरे यांना खासदारांनी सांगितलं असून यावर विचार करू असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळते नैसर्गिक युती करावी अशी मागणी आम्ही खासदारांनी पक्षप्रमुखांना केली आहे असे देखील खासदार गोडसे यांनी सांगितल आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारानंतर खासदारही भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.


त्याचबरोबर खासदार गोडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केलेला आहे . खासदार गोडसे म्हणाले आहेत युतीमध्ये असताना आलेला अनुभव आणि महाविकास आघाडी मध्ये आलेले अनुभव यात खूप फरक आहे असं खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं असल्याचा खासदार गोडसे म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी एक नवीन ट्विस्ट पहायला मिळण्याची शक्यता आहे. सेना आमदारही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेला संपवण्याचा डाव साधत आहेत आणि शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केल्या असल्याचं सांगून महाविकास आघाडीतून वेगळे झाले आहेत.आता खासदार हि भाजप सोबत जुळवण्याची पक्ष प्रमुखांना मागणी करत आहेत.



काल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने आता शिवसेना-भाजप सोबत जाती की काय याच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप हा आपला नैसर्गिक मित्र पक्ष असल्याचं खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून केंद्र आणि राज्य एकत्र नसल्याने प्रकल्प देखील रखडले असल्याची माहिती ठाकरे यांना सेना खासदारांनी दिली आहे असे देखील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितल आहे त्यामुळे आता शिवसेना पक्ष प्रमुख काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचा ठरणार आहे .