मोठी बातमी : …म्हणून ईडीने खासदार संजय राऊत यांचा घेतला समाचार

मुंबई । प्रतिनिधी

खासदार संजय राऊत यांचा देखील ईडीने समाचार घेतला असून मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून ईडीचे छापे अनेक नेत्यांच्या घरावर पडत असल्याने सत्तेत असलेल्या सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यावे अनेकदा खासदार संजय राऊत यांनी ईडीबरोबर भाजपचा समाचार घेतला आहे. मात्र आता त्यांच्याच मालमत्तेवर ईडीने छापा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील आठ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने १०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे.

नेमक प्रकरण काय ?
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीनं आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. अलिबागमधील एकूण ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीनं जप्त केला आहे.