शिवसेना पदाधिकारी हल्ला प्रकरण ; आरोपी निष्पन्न!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याच्या दिवशी नाशिक मधील शिवसैनिक हे शहर पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यापूर्वीच नाशिक शहरात मनाई आदेश लागू झाल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात पंधरा दिवसांची मनाई आदेश लागू केल्याने शिवसेनेचे शिष्टमंडळ नाशिक पोलीस आयुक्तालयात आयुक्तांच्या भेटीला गेले होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.


पोलीस आयुक्तांनी हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला हल्लीखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे . या वेळी पोलीस आयुक्तांनी हल्लेखोर निष्पन्न झाले असून करावाई करण्याचे आश्वसन दिले आहे . परंतु यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे शिवसैनिकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली.पोलीस आयुक्तांनी लेखी आश्वासन न दिल्यास 30 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या दिवशी मोर्चा काढण्यावर शिवसेना ठाम आहे.जर पोलीस आयुक्तांनी निलेश कोकणे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले तर मोर्चा रद्द करण्यात येणार असल्याच शिवसेनच्या शिष्टमंडळा म्हटलं आहे.


मोर्चेबाबत पोलिसांकडे शिवसेनेचा कोणताही अर्ज नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते नाशकात असल्याने त्याच दिवशी शिवसेनेचा पोलीस आयुक्त कार्यालयावर नियोजित मोर्चा आहे. मात्र मनाई आदेश लागू झाल्याने पुढील पंधरा दिवसांसाठी मोर्चे निदर्शने ,आंदोलने करण्यास करण्यास शहरात मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे असे कृत्य झाल्यास मनाई आदेशाचे भंग केल्याची करवाई होऊ शकते शिवसनेने मनाई आदेशा पूर्वीच हा मोर्चा नियोजित केला आहे या मोर्चाबाबत शिवसेनेने पोलिसांकडे कोणताही अर्ज केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले ,त्यामुळे हा मोर्चा नियमांत अडकण्याची शक्यता आहे. 


‘या ‘ कारणामुळे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा
शिवसेना पदाधिकाऱ्यांवर झालेला प्राणघातक हल्ला हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला होता. अशा प्रकारच्या चर्चांना शहरात उधान देखील आले होते. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुहाटी ला गेले असताना त्यांच्या विरोधात निदर्शन करताना त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टरला काळे पासून निदर्शन केल्याने शिवसेना पदाधिकारी असलेले निलेश कोकणे यांच्यावर हा हल्ला झाल्याच्या चर्चा शहरात सुरू होत्या. निलेश कोकणे यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या दिवशी शिवसेना काढण्याच्या तयारीत आहेत.