आमदारांच्या बंडा नंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राज्यात शिंदेगट आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर गळती सुरू झाली आहे . शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांनी राजीनामे दिले आहेत.शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि महिला संघटक सुषमा पुजारी, शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, शाखा क्रमांक 26 च्या महिला शाखा संघटक हेमलता नायडू, शाखा क्रमांक 5च्या महिला शाखा संघटक विद्या पोतदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

आमदारांच्या बंडानंतर आता बऱ्याचश्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु आहेत. तसेच काही शिंदे गटाला समर्थन करत असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येत आहे . शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आता बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.आज बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे. तत्पूर्वी मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांनी राजीनामा देत सुर्वे यांचे समर्थन केले आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे सोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत त्यामुळेत्यांच्या मतदार संघात त्यांचा दरारा असल्याने बरेचसे पदाधिकारी देखील आमदारांनी नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आता शिंदे गटाच्या समर्थनार्थ राजीनामे देत आहेत.