उदय सामंत हल्ला प्रकरणात पाच शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला झाला. पुण्यातील कात्रज या ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे शिवसैनिक असल्याची माहिती होती. शिवसैनिकांनी गाडीला घेराव घालून त्यानंतर गाडीवर दगड फेकला. दरम्यान गाडीवर दगड फेकल्यानंतर उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. उदय सामंत यांच्या गाडीला अचानक घेराव घालून हल्ला केला. हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत घरी जात असताना हा हल्ला झाला होता.
एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. अशात युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांची देखील पुण्याच्या कात्रज या ठिकाणी सभा होती. या सभेसाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान उदय सामंत कात्रजमधून गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचं म्हटलं जात होतं. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यासोबतच चिथावणीखोर वक्तव्य करणारे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात गाडीची काच फुटली यात उदय सामंत यांना दुखापत झाली नाही. मात्र, गाडीत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीला किरकोळ स्वरूपात दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करत पाच शिवसैनिकांना ताब्यात घेतलं असून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.