टॅटू गोंडवने म्हणजे काहींसाठी एक वेगळीच पर्वणी असते, टॅटू गोंडवने भल्या भल्यांची हौसच असते मात्र हाच टॅटू गोंडवने १४ जणांना महागात पडले आहे. टॅटू गोंडवताना एकाच सुईचा वापर केल्याने त्या १४ जणांना एचआईव्ही ची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नाहक त्या १४ जणांच्या जीवावर बेतले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनेक लोक टॅटू गोंदवून घेण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करतात. कारण टॅटू ही खून आयुष्यभर मिटणारी नसते त्यामुळे कोणत्या डिझाइनचा टॅटू गोंदवून घ्यायचा? टॅटू गोंदवून घेणं सेफ आहे का? टॅटू गोंदवून घेताना दुखणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न टॅटू गोंदवून घेताना पडतात. पण हे टॅटू गोंदवून घेणं उत्तर प्रदेशातल्या १४ जणांना महागात पडले आहे.
घटना अशी घडली की, उत्तर प्रदेशामध्ये १४ जाणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्यांचा ताप कमीही होत नव्हता. त्यामुळे त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले. या १४ जाणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. या १४ जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टनं पैसे वाचण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता, तपासानंतर असे लक्षात आले.
त्या टॅटू आर्टिस्टच्या चुकी मुळे या १४ जणांच्या जीवावर बेतात आहे. त्यामुळे टॅटू गोंडवताना काळजी घेणे गरजेचे आहे. जर एखाद्या एचआयव्हीग्रस्ताने टॅटू गोंदवून घेतला आणि त्याला वापरण्यात आलेली सुई ही इतरांना वापरली तर त्या सर्व लोकांना एड्स होऊ शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टिस्ट हा नव्या सुईचा वापर करत आहे की नाही? याची खात्री करुन घेतली पाहिजे.