धक्कादायक..! नाशकात एकाच दिवशी २ मुलांचे अपहरण; घटनेने खळबळ

नाशकात आधीच लहान मुलांच्या अपहरण होत आहे अश्या अफवांच्या वावड्या उठत असताना पंचवटी आणि सातपूर परिसरात २ मुलांच्या अपहरणाने खळबळ उडाली आहे. नाशिककर शहरात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवांमुळे भयभीत झाले असताना ह्या २ अपहारानांमुळे आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही अपहरणाच्या घटना एकाच दिवशी घडल्या असून एक घटना विजय चौक, दत्त मंदिर, फुलेनगार परिसरात घडली असून दुसरी घटना प्रबुद्धनगर सातपूर, येथील आहे.


पंचवटी परिसरातील घटना,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर परिसरात, दत्त मंदिरासमोर, पाण्याच्या टाकीजवळ दि. २० रोजी रात्री ८ च्या सुमारास घरासमोरच खेळत होता. दरम्यान अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केले. अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहे.

सातपूर परिसरातील घटना,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर मधील प्रबुद्धनगर परिसरातील पुष्पराज शिवाजी घुगे (वय. १५ ) याला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत अपहरण केले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या दोन्ही घटना घडल्यामुळे शहरात आणखीनच पसरली आहे. मात्र पोलिसांकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय झाली असल्याचा अफवा उडत आहे. अद्याप अश्या कोणत्याही प्रकारची घटना शहरात घडलेली नसून पोलिसांनी घाबरून न जाण्याचे तसेच परिसरात काही संशयास्पद आढळल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क साधण्याचे नाशिक पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.