Home » धक्कादायक..! प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; ३४ जणांचा मृत्यू

धक्कादायक..! प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; ३४ जणांचा मृत्यू

by नाशिक तक
0 comment

एक धक्कादायक वृत्त समोर येत असून बोट बुडून ३४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बोटमधील १४ जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सीरीयाच्या किनारपट्टीवर घडली आहे. या बोटमध्ये एकूण १२० ते १५० लोक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ३४ स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. बोटमधील १४ जणांना वाचवले असून टार्टौस येथील बासेल रूग्णालयात त्यांना तातडीने हलविण्यात आले आहे.


कशी बुडाली बोट?

प्राथमिक माहिती नुसार, ही बोट लेबनॉनच्या उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात जवळपास दीडशे प्रवासी होते. बहुतेक स्थलांतरित लेबनीज आणि सीरियन होते तर काहींचे ओळखपत्र न मिळाल्याने त्यांची ओळख पटलेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनी खळबळ उडाली असून अजूनही लोकांचा शोध घेणे सुरु आहे अशी माहिती सीरीयाच्या वाहतुक मंत्रालयाने दिली आहे.

ह्या घटना वारंवार होत आहेत

एकूण ६ मिलीयन सीरियन लोकांपैकी १ मिलीयन सिरियन बेकायदेशिरपणे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात एप्रिलमध्ये, लेबनीज नौदलाने पाठलाग केलेली गर्दीने भरलेली स्थलांतरित बोट लेबनॉनच्या त्रिपोलीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू होता.

सप्टेंबरमध्ये देखील अश्या प्रकारची घटना घडली होती, त्यावेळी तुर्कीच्या कोस्टगार्डने दोन बाळांसह सहा स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली होती. मुग्ला प्रांताच्या नैऋत्य किनारपट्टीवरून युरोप गाठण्याचा प्रयत्न करत असलेल्या 73 लोकांना वाचवण्यात यावेळी यश आले. हे प्रवासी ते इटलीला जाण्यासाठी लेबनॉनमधील त्रिपोली येथून चढले होते मात्र ते अपयशी ठरले.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!