धक्कादायक.! रुग्णालयात भीषण आग; आगीत दहा जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे एका खाजगी रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याची महिती मिळाली आहे . शिवनगर परिसरात असलेल्या न्यू लाईफ मल्टी स्पेशलिटी या खाजगी रुग्णालयात सोमवारी दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. आगीनंतर रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . अग्निशमन दलाला या घटनेची महिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंब घेऊन घटना स्थळी दाखल झाले जवानांना तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या रुग्णालयामध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे अनेक जण रुग्णालयात अडकल्याचे समजते.

अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. त्याचबरोबर आगीची माहिती मिळताच आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनीही या घटनेची माहिती घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.तर प्रत्यक्षदर्शींनी अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत पाहिले आहेत. हॉस्पिटलला लागलेल्या आगीच्या वेळी रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह 150 लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची महिती मिळाली आहे . हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे . रुग्णालयात हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.