हैद्राबाद : मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील पाच मित्रांनी बलात्कार केला आणि घटनेचा व्हीडीओ देखील काढला. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे हा व्हीडीओ व्हायरल सुद्धा झाला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याने हैदराबाद हादरून गेले आहे. याप्रकरणी हयातनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि पीडित मुलगी हे मित्र आहेत. ऑगस्टमध्ये आरोपी हे पीडितेच्या घरी गेले होते. त्यावेळी तिच्या घरी कुणीही नव्हते. आरोपींनी तिला धमकावले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. त्यातील एका आरोपीने मोबाइल फोनमध्ये लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ चित्रीत केला. १० दिवसांनी पुन्हा दोघे जण तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यावेळी त्यांनी फोनमध्ये व्हिडिओ चित्रीत केला.
आता काही दिवसांपूर्वी या विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना आपबीती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी मंगळवारी (दि. २९ ) रोजी हयातनगर पोलिसांत आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.
आरोपी विद्यार्थी हे नववी आणि दहावीच्या वर्गात शिकतात. शाळा सुटल्यानंतर परिसरात फिरायचे. मोबाइल फोनमध्ये अश्लिल व्हिडिओ बघायचे. त्यांनी पिडीतेचा देखील असाच अश्लील व्हीडीओ बनवला व तो व्हायरल देखील केला. ही घटना अतिशय गंभीर आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.