Home » धक्कादायक..! नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धक्कादायक..! नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

by नाशिक तक
0 comment

नाशिक : शहरात सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. निवासी वसतिगृह (Residential Hostel) मध्ये राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुलीसोबत हे कृत्य झाले असून वसतिगृहाच्या ३० वर्षीय संचालकानेच हे संतापजनक कृत्य केले आहे. नाशिक शहरातील (in Nashik city) माने नगर परिसरात घडला प्रकार असून घटनेने नाशिक हादरले आहे. शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) नाराधामा विरोधात पॉक्सो अंतर्गत (Under POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द किंग फाऊंडेशन संचालित आधार आश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुले मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृह मध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर ३० वर्षीय संचालकानेच बलात्कार केला आहे.

मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा हादरले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार तीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एका आधार श्रमातल्या घटनेने नाशकात खळबळ उडाली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधार तीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. नाशिकच्या त्रंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधार तीर्थ आश्रम असून या आश्रमात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले राहतात. आणि याच आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि आज किंग फाऊंडेशन संचालित ज्ञानपीठात गुरुकुल आधार आश्रमात बलात्काराचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!