धक्कादायक! महिलेवर सामुहिक बलात्कारा नंतर गुप्तांगाला सिगारेटचे चटके..

मुंबई : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर सामुहिक बालात्कार करत तिघा नराधमांनी पिडीतेच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देण्याची क्रूर घटना घडली आहे. हा संतापजनक प्रकार मुंबईतील कुर्ला येथे बुधवारी (दि. ३० ) घडला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून रोष व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ३० ) रोजी मुंबईतील कुर्ला येथे बुधवारी 42 वर्षीय महिलेवर याच परिसरात राहणाऱ्या तीन व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी त्या महिलेवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटने चटके दिले. धारधार शस्त्रांनी वारही केले. आरोपीमधील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओही तयार केला.  या घटनेबाबात पोलिसांत तक्रार दिल्यास व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी आरोपींनी त्या महिलेला दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित महिलेने आपबिती शेजाऱ्यांना सांगितली, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, तत्काळ एका एनजीओसोबत संपर्क करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 376 , 376 डी , 377, 324 आणि इतर अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिला घरात देखील सुरक्षित नाहीत. मागील काही दिवसांपासून मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिला घरात देखील सुरक्षित नाही नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी यावर आता कठोर पाऊले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.