धक्कादायक..!” थेट घरात झोपलेल्या ४ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न.”

नाशिक : नाशिकमध्ये एका चार वर्षाच्या मुलीला घरातूनच पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या शरणपूर रोड येथे समोर आला आहे.या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आणि फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार बेतले नगर ,शरणपूर रोड येथे एका घरात फिर्यादी महिलेची मुलगी आणि नातं हे घरात हॉल मध्ये झोपलेले असताना व सदर महिला हि किचन मध्ये काम करत असताना एका अज्ञात इसमाने या महिलेच्या चार वर्षांच्या नातीच थेट घरात घुसून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याचा हा प्रयत्न फसला.या संपूर्ण घटने प्रकरणी महिलेने सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली असून

सरकारवाडा पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३६३,आणि ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहे.