धक्कादायक..! सातपूर मध्ये घडली सिनेस्टाईल घटना

एखाद्या हिंदी सिनेमा प्रमाणे एक प्रकार नाशिकच्या सातपूर परिसरात घडला आहे. सातपूरच्या अशोक नगर येथे भरवस्तीत भरधाव वेगाने दुचाकी वर आलेल्या युवतीने एका युवकाजवळ येत दुचाकी हळू करून त्याच्या तोंडावर स्प्रे फवारून पसार झाली आहे. या घटनेत स्प्रे विषारी असल्यामुळे तो युवक जागीच बेशुद्ध पडला या घटनेने परिसरात एकच धांदल उडाली आणि सिनेमाप्रमाणेच विविध चर्चा रंगू लागल्या अशोक नगर येथे दुपारी नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती .मंगळवारी दुपारच्या सुमारास एका पायी जाणाऱ्या युवकावर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी वरील युवतीने त्याच्याजवळ येत गाडीचा वेग कमी केला आणि काही क्षणातच आपल्याजवळ असलेल्या सप्रे बॉटल काढून त्याच्या चेहऱ्यावर फवारला आणि तिथून ती युवती आली त्या वेगाने पसार झाली स्प्रे फवारल्याने युवक रस्त्यावर कोसळला ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्याजवळ धाव घेतली त्वरित तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणले घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या युवकांनी कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली येऊ का सह त्याच्या कुटुंबीयांनी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला मात्र या युवकाने तक्रार देण्यास नकार दिला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.