धक्कादायक..! पत्ता विचारण्याचा बहाणा करत तरुणावर सामुहिक अत्याचार

देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतानाच आता खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर येत आहे. एका तरुणावर ४ महिलांनी अत्यचार केल्याची धक्कादायक आणि तेवढीच खळबळजनक घटना घडली आहे. घटना पंजाबच्या जालंधरमधली असून कामावरून परतत असताना चार महिलांनी पत्ता विचारण्याचे नाटक केले. त्यानंतर मला बेशुद्ध करत नऊ ते दहा तास बंदी बनवत सामूहिक अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणाने दिली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीसही थक्क झाले आहेत. याप्रकरणी पंजाब पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

तर घडलेली घटना अशी की, पिडीत तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. सोमवारी तो कामावरून घरी परतत असताना त्याच्या नेहेमीच्या वाटेतच त्याला चार महिलांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रोखले. व काही कळण्याच्या आत या महिलांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर तरुण हा बेशुद्ध झाला.

जेव्हा तरुणाला शुद्ध आली तेव्हा तो नग्नावस्थेत एका कारमध्ये होता. त्याचे हातपाय बांधलेले होते. डोळ्यावरही पट्टी बांधण्यात आली होती. या कारमध्ये चार महिला मद्यपान करत होत्या. या महिलांनी आळीपाळीने त्याच्यावर बलात्कार देखील केला.

अत्याचारानंतर या महिलांनी तक्रारदार तरुणाला एका अज्ञातस्थळी नेऊन सोडले आणि कारमध्ये बसून पळ काढला. दरम्यान, घरी आल्यानंतर या तरुणाने आपल्यासोबत घडलेला प्रकार पत्नीला सांगितला. बदनामीपोटी पत्नीने त्याला पोलिसांत तक्रार करू दिली नाही. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याने पंजाब पोलिसांत तक्रार दाखल केली.

ज्या महिलांनी त्याच्यावर बलात्कार केला त्यांचे वय 23 ते 26 वर्षांच्या दरम्यान आहे. प्रकरणाचा शोध पंजाब पोलीस घेत असून संशयित महिलांचा शोध सुरु आहे.