धक्कादायक..!भंडाऱ्यात निर्भया प्रकाराची पुनरावृत्ती ,तपास एसआयटीकडे

भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील कान्हाळमोह गावाजवळ उघडकीस आली आहे .या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे .गोंदिया जिल्ह्यातील महिला घरगुती वादानंतर माहेरी जात असताना तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला पीडितेवर सध्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती गंभीर असून रक्तस्राव थांबवण्यासाठी आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी करण्याची निर्देश शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत . तसेच पिढीतील सर्वतोपरी उपचार मिळावेत असे निर्देशही देण्यात आले आहेत



गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका गावात राहणारी 35 वर्षाची महिला 30 जुलैला कौटुंबिक वादानंतर माहेरी पायी जात असताना वाटेत तिला श्रीराम उरकुडे यांनी थांबवले गाडीने घरी सोडतो असे सांगून तिला गाडीत बसवले घरी नेण्याऐवजी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातल्या मुंडी पार गावाजवळ तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला पळसगाव मार्गावर नेले जागी तिच्यावर अत्याचार केल्यावर तिला सोडून उरकुडे तिथून पळून गेला .रात्रीच्या सुमारास एकट्याने जंगल मराठी जाणारी ही महिला कान्हाळमोह येथे पोहोचली तिथे पुन्हा एका व्यक्तीने तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले तिचा त्याच्यावर विश्वास बसला नाही त्याच वेळी जवळच्या डाव्या जवळून टायर दुरुस्ती करणाऱ्यांना त्या व्यक्ती सोबत जाणे धोका नसल्याचे सांगितले .


त्यानंतर घरीच सोडण्याचे सांगून त्या महिलेला दुचाकीवरून जवळच्या शेतात नेले तिथे टायर दुरुस्ती करणारही आला दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असता तीन दिवस या महिलेवर अत्याचार सुरू होते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अत्याचारानंतर पिढी त्याला कान्हाळमोह जवळच्या रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले यानंतर काही ग्रामस्थांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिलादिसली ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती देऊन भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे .


या अत्याचारा प्रकरणातील तीनपैकी दोन संशयित नराधमांना पोलिसांनी अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे अमित सर्वे आणि मोहम्मद अन्सारी अशी या संशयीतांची नावे असून त्यांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.