नाशिक : शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्रमिक नगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला खाण्यापिण्याचे आमीष दाखवत ओळखीच्या व्यक्तीने घरात बोलवून घेत वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पॉर्न व्हिडिओ दाखवत संशोधने हे कृत्य केलं असून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या संशयीतास अटक केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगा आणि तीस वर्षे संशयित एकमेकांचे परिचित असून ते एकाच भागात राहतात काही दिवसांपूर्वी पीडित शाळकरी मुलगा रस्त्याने जात असताना संशयित व्यक्तीने त्यास आपल्या घरात बोलावले मुलगा घरात आल्यावर त्याला खाण्यापिण्याचे पदार्थ दिले दोघांमध्ये जवळीक वाढल्याने दुसऱ्या दिवशी त्यास बोलावून घेत संशयिताने खाण्यापिण्याचे आमीष दाखवले . त्यानंतर खाण्यासाठी चांगले देईल असे सांगून मुलास मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवला त्यानंतर मुलासोबत त्याने अश्लील चाळे केले. यावेळी मुलांनी नकार देत प्रतिकार केला असता संशयित आणि त्यास मारहाण करीत बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला तसेच पुन्हा सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
संशयित व्यक्तीने मुलास धमकी दिल्यामुळे मुलगा त्याचा अत्याचार सहन करत राहिला संशयिताचे ब्लॅकमेलिंग वाढल्याने मुलाने आपल्या पालकांकडे घडलेली घटना कथन केली. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली अत्याचार झालेल्या मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयीतास अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.