धक्कादायक! बलात्कार रोखण्यासाठी मुलींनी घेतली छतावरून उडी

ओडिसा राज्यातील राजपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने सामूहिक बलात्कारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शाळेच्या छतावरून उडी घेतली आहे. या प्रयत्न तिला गंभीर दुखापत झाली आहे. राजपुर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. क्योझर येथील कलिंगानगर भागात मध्ये एक मुलगी भावासोबत क्योझरमध्ये तिच्या मोठ्या बहिणीकडे जात होती दरम्यान दोघे बसमधून उतरले त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता त्यावेळी बस थांबाजवळ उभी असलेल्या काही जणांनी त्यांना बाजूच्या शाळेत थांबण्याचा सल्ला दिला .


पाऊस थांबल्यानंतर पुढे निघा असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी दोघे भाऊ बहिणीने सल्ला एकूण शाळेत गेले काही वेळाने त्याठिकाणी पाच जण शाळेत आले त्यांनी मुलीच्या भावाला मारहाण करून शाळेतून हाकलून लावले त्यानंतर त्यांनी मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला मात्र मुलीने स्वतःच्या संरक्षणासाठी शाळेच्या छताकडे धाव घेतली आणि तिथून उडी घेतली त्याचवेळी तिच्या भावाने रस्त्यावर जाऊन आरडाओरडा केल्यानंतर काहीजण मदतीसाठी धावले .