धक्कादायक ..! नाशिकमध्ये प्लास्टिक ड्रममध्ये बुडवून पत्नीला केले ठार

नाशिकमधील मालेगाव मध्ये खळबळजनक घटना घडली आहे . नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालेगाव शहरातील रमजान पुरा पोलीस ठाण्यात अदनान खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुल खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस येताच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ हि घटना घडली आहे.

येथे राहणारे अब्दुल वफा अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे. रमजान पुरा भागात खान कुटूंबिय राहते. या दोन्ही नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. सदर संशयित अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करीत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांत नेहमी भांडणे होत असत. दि. २१ जुलै रोजी देखील रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय तीस मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने तीस पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून मारले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.