Home » शेजाऱ्याकडून ‘टोमॅटो’ मागितल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या

शेजाऱ्याकडून ‘टोमॅटो’ मागितल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या

by नाशिक तक
0 comment

शेजाऱ्याकडून टोमॅटो मागण्या सारख्या किरकोळ कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना (The husband killed his wife for a minor reason like asking for tomatoes from the neighbor) समोर येत आहे. शेजाऱ्याकडून टोमॅटो (Tomato) मागणं आपल्या जीवावर बितेल याची तिला कल्पनाही नसेल. या किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला इतकी भयंकर शिक्षा दिली. ज्याची कल्पना कोणीच करू शकणार नाही.

घरात कधी कोणती गोष्ट नसली तर आपण ती शेजाऱ्यांकडून मागतो आणि शेजारधर्म म्हणून शेजारी मदतही करतात. मात्र छत्तीसगड, रायगढमध्ये केवळ टोमॅटो मागण्याच्या कारणावरून ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागितल्याने पतीने चक्क पत्नीला मारहाण केली. पतीने त्याच्या पत्नीला एवढं मारल की तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पत्नीची हत्या केल्याने पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले, मारहाण करत हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्तीसगड, भेडीमुडा (Bhedimuda in Chhattisgarh district) गावातील हा खळबळजनक प्रकार. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५० वर्षाच्या भगत राम अगरिया याने शेजाऱ्याकडून टोमॅटो आणल्यामुळे दांड्याने पत्नीला मारहाण केली आणि तिचा जीव घेतला. त्याने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागण्यास पत्नीला मनाई केली होती. तरी देखील आपल्याकडे टोमॅटो राहिले नाही म्हणून पत्नी शेजाऱ्याकडे टोमॅटो मागण्यासाठी जात असल्याने पतीने हे धक्कादायक पाऊल उचललं. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु केली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत या घटनेला परिणाम देणारा पती फरार झाला होता. दरम्यान पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचे वडील यांनी जबाबात सांगितले की, सून टोमॅटो मागण्यासाठी शेजाऱ्याकडे जात होती. मुलाने मनाई केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने बाहेरून काठी आणून सूनेला मारहाण केली. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने सूनेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चौकशी करुन पुढील कारवाई करत आहेत. मात्र निव्वळ टोमॅटो मागण्याच्या कारणावरून घडलेली ही घटना धक्कादायक आणि संतापजनक देखील आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!