ST कर्मचाऱ्यांना दाखवला ”घरचा रस्ता”

नाशकात गेल्या ३ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना एसटी प्रशासनाने निलंबित केलं आहे.त्यामुळे आता एसटी कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून सर्व एसटी कर्मचारी संप करत आहे व त्यामुळे जिल्हाभरातील बसेस या पूर्णपणे बंद आहेत,

आणि यामुळे एसटी च मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हे आंदोलन मोडून काढण्याच्या हेतूने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे आणि त्यातच आता या सर्व प्रकारामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.