श्रद्धा वालकर हत्याकांड..! मविआवर गंभीर आरोप

श्रद्धा वालकर हत्याकांडवरून (Shraddha Walker murder case) आता मविआ आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगणार दिसत असून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) यांनी या प्रकरणावरून आता मविआला लक्ष केले आहे. 2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे (Vasai Police) आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती त्या ताक्ररीतच आफताब मला मारून माझे तुकडे करून टाकले अशी धक्कादायक माहिती श्रद्धाने दिली होती तर त्यावर काही कारवाई का झाली नाही असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती? श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून? असे म्हणत तत्कालीन मविआ सरकारला शेलारांनी लक्ष केले आहे.


सध्या प्रसार माध्यमांवर श्रद्धा वालकर हिने २३ नोव्हेंबर २०२० रोजी वसई पोलिसांकडे लिहिलेल्या तक्रारीचा आशय व्हायरल होत आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडातील हा मोठा खुलासा आहे. वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत श्रद्धाने आफताब तिला ब्लॅकमेल करायचा, शिवीगाळ करुन मला मारायचा, एकदा गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला असा धक्कादायक उल्लेख आहे. आफताब माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही त्याने श्रद्धाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


यावरून आता पुन्हा एकदा भाजपने माविआवर निशाना साधला असून महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का?” असा सवाल शेलारांनी केला आहे.


शेलार म्हणाले, नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून आमच्या महाराष्ट्रातील एका भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. या सर्वांची चौकशी सुरु असताना हे लेखी तक्रारीचे पत्र माध्यमांसमोर आले आहे. या पत्राची रिसिव्हड कॉपी देखील माध्यमांवर दिसत आहे. असे शेलार यांनी सांगितले.

मविआवर गंभीर आरोप

“महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती? श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून?” की सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून?, की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते?  असे सवाल शेलार यांनी तत्कालीन मविआ सरकारवर केले आहेत.

तर श्रद्धा आज वाचली असती

शेलार पुढे म्हणाले, या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलिस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती.