Shubhaman Gill|’शुभमनचे दमदार २००’, बनवला खास रेकॉर्ड..!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शुभमन गिलने आपला फॉर्म दमदार ठेवला आहे. या मालिकेतील आज पहिलाच सामना खेळला जात असून या सामन्यात शुभमनने शानदार द्वीशतक झळकावलं आहे. शुभमनने हे पहिलेच द्विशतक आहे त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन याने आज सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने २०८ धावा ठोकत एकहाती सामना सांभाळला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये देखील शुभमन ने शानदार शतक झळकवल होत. त्यानंतर त्याचा उत्कृष्ट खेळ कायम असून त्याने आता द्विशतक केले आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमनने ८७ चेंडूत २०८ धावा केल्या आहेत. यात १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या शतकासोबत त्याने एक खास रेकॉर्डही नावावर केला आहे. जलदगतीने वनडेमध्ये १००० धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा तर भारतीय पहिला खेळाडू ठरला आहे.

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकत त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या आहे. त्याचा हा १९ डाव असून एवढ्या लवकर त्याने १००० धावांना गवसणी घातली आहे. जगातील इमामुल हक याच्या नंतर शुभमन याने दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे सोडले आहे. त्या दोघांनी २४ डावांत १००० धावा केल्या होत्या.शुभमनने हे लक्ष १९ डावांत भेदले आहे. त्याच्या या कामगिरीचे क्रिकेट जगत आणि क्रिकेट प्रेमींकडून कौतुक होत आहे.