‘काही लोक विकृत विचाराचे म्हणून ते..’ उदयनराजेंची विरोधकांवर टीका

नाशिक : भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली असून बैठकीत जे मुद्दे मांडले ते सर्व लोकहिताचे होते. सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते आणि ते
लोकांपर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

महापुरुषांबद्दलची वक्तव्य

यावेळी उदयनराजे यांनी महापुरुषांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘विकृत्तीत वाढ का होतेय, हे समजत नाही. महापुरुषांनी देशाच्या प्रगतीसाठी विचार मांडले आहेत. त्यांच्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. वक्तव्य करणाऱ्यांची वैचारिक पातळी समजून घ्यावी. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल. महापुरुषांनी मोठं योगदान दिलं आहे,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान मुंबई दौरा

विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांकडे मुद्दे नाही ते विकृत विचाराचे टीका करतात या शब्दांत उदयनराजेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. मोदी या कार्यक्रमानंतर अंधेरी पूर्वतील मरोळ येथील दाऊदी बोहरी  समाजाच्या अल जामिया तुस सफिया या युनिव्हर्सिटीचं उद्घाटनाचे देखील आयोजन होते. दरम्यान त्यांच्या दौऱ्यावर टीकेची झोड उठली असता. ‘विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच काम त्यांना उरतं. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार करतात. मात्र लोक सुज्ञ आहेत ते लोक विचार करतात’ असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.