नाशिकवर त्र्यंबकेश्वराची कृपा, राम वनवासाला जाणार नाही!

नाशिक । प्रतिनिधी

राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात, एक आहे की दुसरं कोणी पूढे जाऊ नये असे असतात तर दुसरे आपल्यापेक्षा आपले कार्यकर्ते पुढे जावे अशी इच्छा ठेवतात. सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले तर ‘सबका साथ सबका विकास होगा’ अशी मनीषा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ उत्तर महाराष्ट्र शाखा सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, इथे त्रंबकेश्वरची कृपा आहे, त्यामुळे रामाला पुन्हा वनवासाला येण्याची गरज राहणार नाही. भगतसिंग ला राज्यपाल म्हणूनच यावे लागेल, राज्यापाल म्हणून आलो तर कुटुंबासह येण्याची गरज नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी उपस्थित भुजबळ यांना लगावला.

ते पुढे म्हणाले कि, राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक आहे की दुसरं कोणी पूढे जाऊ नये असे असतात तर दुसरे आपल्यापेक्षा आपले कार्यकर्ते पुढे जावे अशी इच्छा ठेवतात. सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले तर ‘सबका साथ सबका विकास होगा’ असेही ते म्हणाले, म्हणून तर महात्मा गांधी यांचे नाव हिटलर साठीनाही तर त्यागा साठी घेतले जाते, म्हणून राजकरणात काम करणाऱ्या मंडळींना वाव आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड मधील लोकसारखे आहेत, उत्तराखंड मधील लोक मजुरी करू शकतात, महाराष्ट्र मधील लोक शेती करतात, द्राक्ष, कांदे पिकवतात, त्यामुळे दोन्ही राज्ये सारखीच असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या सिल्वर ओक वरील हल्ल्याचा त्यांनी यावेळी निषेध केला. राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातील एक जेष्ठ नाव म्हणजे शरद पवार आहेत. असं त्यांच्या घरावर हल्ले करणे चुकीचे असून हल्लेखोरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.